Shardiya Navratri 2023 Ashtami : नवरात्रीत महाअष्टमी तिथीला विशेष महत्व, जाणून घ्या तारीख, वेळ, पूजन पद्धत

Shardiya Navratri 2023 Ashtami : नवरात्रीत महाअष्टमी तिथीला विशेष महत्व, जाणून घ्या तारीख, वेळ, पूजन पद्धत
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्र सुरू आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे. हिंदू धर्मामध्ये 'शारदीय नवरात्र'ला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षभरात चार प्रकारची नवरात्र साजरी करण्याची परंपरा आहे. नवरात्रीमधील अष्टमी तिथीला विशेष महत्व असते. यंदा अष्टमी तिथी कधी आहे, पूजा विधी, महत्व आणि मान्यता याबद्दल जाणून घेऊया. (Shardiya Navratri 2023 Ashtami)

Shardiya Navratri 2023 Ashtami : आठव्या दिवशी का केली जाते पूजा

देवीचे हे रूप आपल्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते. त्यांना त्यांच्या सर्व त्रासांपासून मुक्ती देते, अशी श्रद्धा आहे. देवीचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती. म्हणून नवरात्रीच्या आठव्या दिवशी तिची पूजा केली जाते. भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचे रूप आहे. ती संपत्ती आणि सुख समृद्धी, शांतीची प्रमुख देवता आहे असं म्हटलं जाते.

महाअष्टमी : तारीख, वेळ, पूजन पद्धती आणि महत्व

सध्या शारदीय नवरात्री सुरू आहे. सर्वत्र आनंदाचे आणि चैत्यनाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शारदीय नवरात्रीमध्ये  नऊ दिवस देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा करण्यात येत असते. या दिवसांमध्ये भाविक नऊ दिवस भक्तीभावाने उपवास करत असतात आणि विशेष अशी  पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमी तिथीला अधिक महत्व असते. यंदाच्या नवरात्रीची अष्टमी तिथी कोणत्या तारखेला आहे, पुजा कशी करावी आणि त्याचे महत्व आपण समजून घेवूया.

शारदीय नवरात्रीमधील अष्टमी तिथीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्यात येते. यंदाची अष्टमी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी असून, आश्विन शुक्ल अष्टमी तिथी प्रारंभ २१ ऑक्टोबर २०२३ रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी होईल. तर २२ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ७ वाजून ५८ मिनिटांनी आश्विन शुक्ल अष्टमी तिथी समाप्ती होईल.

नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे का असतात?

शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की, शारदीय नवरात्री दिवसांमधील शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. कारण अष्टमी तिथीला देवी दुर्गेने चंड-मुंडाचा वध केला होता तर नवमीच्या दिवशी मातेने महिषासुराचा वध केला होता. यामुळे देवीने भक्तांसह संपुर्ण जगाचे रक्षण केले होते. काही कारणास्तव काहींना नवरात्री नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी उपवास करून देवीची उपासना केल्यास लाभ मिळतो. तो म्हणजे या दिवशी उपवास केल्याने संपूर्ण नऊ दिवस उपासनेचे फळ मिळते. महाष्टमीच्या दिवशी नऊ मातीची भांडी ठेवून दुर्गा देवीच्या नऊ रूपांना आवाहन केले जाते.

Shardiya Navratri 2023 Ashtami : अष्टमी तिथी आणि कन्या पूजन

विविध धार्मिक ग्रंथामध्ये, कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते असं म्हटलं आहे. अष्टमी तिथीला कन्या पूजन करणे लाभदायक मानले जाते. जेव्हा एखाद्या घरात मुलीचा जन्म होतो तेव्हा आपल्या घरी देवी किंवा लक्ष्मी अशी म्हणण्याची पद्धत आहे. कन्या भोजनात हरभरा भाजी, शीरा, पुरी, पुरणपोळी खीर अर्पण केली जाते. या पुजेला कुमारी पूजा असेही म्हणतात. अस म्हटलं जात की, कन्या पूजन केल्याने देवी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. भक्तांना  ऐश्वर्य प्राप्त होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news