बारामती : कर रचनेवरुन शरद पवार यांचा मोदींवर निशाणा

बारामती : कर रचनेवरुन शरद पवार यांचा मोदींवर निशाणा
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : जीएसटी लागू करण्याबाबत मनमोहनसिंग सरकारच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जीएसटीवर सर्वाधिक हल्ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र आज जीएसटी बाबत त्यांची भूमिका बदलली आहे. जीएसटीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्याचा थेट परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसत आहे. असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. कराचा किती बोजा टाकायचा याचा विचार करा असेही पवार म्हणाले.

बारामती मर्चंटस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन केले जाते. यावेळी व्यापाऱ्यांनी जीएसटी बाबत नाराजी व्यक्त केली. हाच धागा पकडत पवार यांनी कर रचनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पौर्णिमा तावरे, जवाहर वाघोलीकर, अमोल वाडीकर, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, किशोर सराफ, सदाशिव सातव, जय पाटील, नीलेश भिंगे, सचिन सातव, नीलेश निंबाळककर, यश संघवी, तेजपाल निंबळककर आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत, वाहन खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगार निर्मिती तर होतेच पण त्या बरोबर अनेक लघुद्योगही चालतात, यामुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक हवे, प्रोत्साहनात्मक हवे. चांगले वातावरण तयार करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्ताविकात जीएसटीमुळे भुर्दंड वाढला, गूळाची आवक मंदावली, वारंवार कररचनेतील बदलांचा फटका बसत असल्याचे नमूद केले. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

भारतीय काहीही करू शकतात

आज जर्मनी व अमेरिकेत काही कंपन्या संकटामुळे बंद पडलेल्या आहेत. ही संधी समजून आपण काहीतरी पावले उचलायला हवीत, भारतीय वंशाचे उद्योगपती इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारु शकत असेल तर आपण भारतीय काहीही करु शकतो, या जिद्दीने काम करणे गरजेचे असल्याचे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news