Uddhav Thackeray : आयोगाच्या फॉरमॅटमध्ये नसलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रे शिवसेनेनेच रोखली | पुढारी

Uddhav Thackeray : आयोगाच्या फॉरमॅटमध्ये नसलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रे शिवसेनेनेच रोखली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राज्यभरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने नव्हे तर खुद्द ठाकरेंच्याच शिवसेनेने बाद ठरवली आहेत. ही प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. (Uddhav Thackeray)

शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुमारे साडेआठ लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल केले असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली मंगळवारी दिली होती. ठाकरे गटाने राज्यभरातून सुमारे अकरा लाख अर्ज तसेच प्रतिज्ञापत्रे गोळा केली होती. निवडणूक आयोगाला विहित नमुन्यात अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे हवी होती. आयोगाला अपेक्षित असलेल्या फॉरमॅटमधील सुमारे साडेआठ लाख अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आणि जमा केलेल्या ११ लाख अर्जांपैकी जवळपास अडीच लाख अर्ज फाॅरमॅटनुसार नव्हती. त्यामुळे ही प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे पाठविण्यात आली नाहीत. दैनिक पुढारीने हे वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर एकच चर्चा उठली आणि फॉरमॅटमध्ये नसलेली प्रतिज्ञापत्रे जणू काही निवडणूक आयोगानेच बाद ठरवल्याचे हे वृत्त असल्याचा भास वृत्तवाहिन्यांनी वाजवणे सुरू केले. प्रत्यक्षात आयोगाने ही प्रतिज्ञापत्रे बाद केल्याचे पुढारीच्या बातमीत कुठेही म्हटलेले नाही. विहित नमुन्यात नसल्यामुळे ही प्रतिज्ञापत्रे निकामी ठरल्याचेच या बातमीत स्पष्ट म्हटले आहे.(Uddhav Thackeray)

खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार, याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. यासंदर्भातील सुनावणीत आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी शिवसेना ( उद्धव ठाकरे) गटाने राज्यभरातून प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत गोळा केलेल्या अकरा लाख अर्जांपैकी आयोगाला अपेक्षित नमुन्यातील साडेआठ लाख अर्ज आयोगाकडे पाठवली गेली आहेत. दोन ट्रक भरून हे अर्ज पाठविले गेले. आयोगाला हव्या असलेल्या फाॅरमॅटमध्ये असलेलेच अर्ज व प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे पाठविण्यात आली. फाॅरमॅटमध्ये नसलेली उर्वरित अडीच लाख अर्ज व प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे न पाठविण्याचे धोरण ठाकरे गटाने स्वीकारले. त्यामुळे आयोगाकडे पाठविलेले सर्व साडेआठ लाख अर्ज भक्कम आणि पक्के ठरणार आहेत, असे शिवसेनेतील सुत्रांनी सांगितले. (Uddhav Thackeray)

अधिक वाचा :

Back to top button