प्रवासी म्हणून बसले अन् टेम्पो चालकाला मारहाण करून लुटले

file photo
file photo
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  प्रवासी म्हणून टेम्पोमध्ये नेवासा फाटा येथून बसलेल्या चार चोरट्यांनी टेम्पोचालकालाच मारहाण करून पैसे लुटल्याची खळबळजनक घटना रविवार (दि.15) रोजी रात्री आठ वाजता खडका फाट्याजवळ घडली. या घटनेतील जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांना पकडण्यासाठी नेवाशाचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलिस कर्मचारी अशोक लिपणे, किरण गायकवाड, संदीप बर्डे, सुमित करंजकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीवरुन चारही आरोपी एका तासात गजाआड करण्यात यश मिळविले.

रविवारी दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजीनगर येथून टेम्पो फरशी घेऊन शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथे उतरवून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे नेवासा फाटामार्गे जात असतांना नेवासा फाटा येथे टेम्पोचालक परवेज फकरु शेख याला चौघांनी हात केल्यामुळे चालकाने टेम्पो थांबवून कुठे जायचे, अशी विचारणा केली. पंढरपूरला जायचे म्हणून टेम्पोत बसलेल्या चौघांनी चालकाला दमबाजी करीत त्याच्या खिशात हात घालून आरोपी शिवाजी बंडू विटकर दत्तात्रय ज्ञानेश्वर भुजंग,अमोल पुंजाराम मांजरे, गणेश (राहणार तिघेही नेवासा फाटा), कचरू भुजंग (रा.मुकिंदपूर) यांनी पैसे काढले. खडका फाट्याजवळ चालकाने टेम्पो थांबविला असता, या चालकालाच चौघांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील 10 हजार 600 रुपये आधारकार्ड घेऊन चौघे नेवासा फाट्याकडे पळून गेले. टेम्पोचालकाने पोलिस डायल नंबर 112 ला ही माहिती दिली.

नेवासा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही आरोपी पकडून नेवासा पोलिस ठाण्यात आणले असता, टेम्पोचालकाला लुटण्याच्या आधीच सोमनाथ दीपक बजागे ( रा.पडळवाडी जि. कोल्हापूर) यालाही नेवासा फाटा येथे मारहाण करुन या चौघांनी मोबाईल व खिशामधील 700 रुपये काढून घेतले. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी गजाआड करण्यात नेवासा पोलिसांना यश आले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news