Aishwarya Rai : पोन्नियिन सेलवनमधील ऐश्वर्याचा लूक पाहून जुन्या नंदिनीची चर्चा

Aishwarya Rai
Aishwarya Rai
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai ) गेल्या दिवसांपासून फिल्मी झगमटापासून दूर आहे. परंतु, अनेक दिवसांच्या प्रदिर्घ काळानंतर तिची मोठ्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. ऐश्वर्या राय 'पोन्नियिन सेलवन' या साऊथ चित्रपटातून चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील तिचा पहिल्या लूकने चाहत्यांना भारावून सोडले. तर सध्या तिच्या आणखी एका लूकची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.

नुकतेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ( Aishwarya Rai ) तिच्या इन्स्टाग्रामवर 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटातील एक बीटीएस फोटो शेअर केला आहे. फोटोत ऑरेंज गोल्डन लेहग्यांसोबत मॅचिंग ज्वेलरीत ऐश्वर्या खूपच ग्लॅमरस दिसतेय. यावेळी ऐश्वर्या एका कॅमेऱ्याच्या जवळ बसलेली असून तिने हटके पोझ दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'oddess Nandini ??, She's coming y'all ?? THE BESTTT'. असे लिहिले आहे. 'पोन्नियिन सेलवन' या चित्रपटात ऐश्वर्याने नंदिनीची भूमिका साकारणार आहे.

ऐश्वर्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यानंतर काही चाहत्यांची ऐश्वर्याच्या या लूकचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही चाहत्यांनी २० वर्षापूर्वीचा 'हम दिल दे चूके सनम' या चित्रपटात ऐश्वर्याच्या भूमिकेची आठवण काढली आहे. २० वर्षापूर्वीच्या 'हम दिल दे चूके सनम' चित्रपटात तिने नंदिनीचे पात्र साकारले होते. ती आजही तशीच दिसतेय असे म्हटले आहे. यामुळे नंदिनीच्या लूकची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये पसरली आहे.

कल्की कृष्णमूर्ती यांच्या १९५५ मधील 'पोन्नियिन सेलवन' या कादंबरीवर आधारित दोन चित्रपटांपैकी हा एक आहे. मध्यंतरी, ऐश्वर्या रायचे वजन वाढले होते. यानंतर तिने कडी मेहनत घेवून चित्रपटासाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात विक्रम आदित्य करिकलन, कार्थी वन्थियाथेवन, त्रिशा कुंदावई आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news