

पुढारी ऑनलाईन : भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदर १० बेसिक पॉईंटने वाढवले आहेत. त्यामुळे वाहनकर्ज, गृहकर्ज आणि इतरही कर्ज महागणार आहेत. नव्या व्याजदराची अंमलबजावणी बुधवारपासून (दि. १५ फेब्रुवारी) होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR (Marginal Cost of Funds Based Landing Rate) वाढवल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एक महिन्याच्या मुदतीसाठी MCLR ८ टक्केंवरून ८.१० टक्के झाला आहे, तर सहा महिन्याच्या मुदतीसाठी हाच MCLR 8.30 टक्केवरून ८.४० टक्के इतका झाला आहे. ही नवी वाढ सर्व मुदतीसाठी लागू केली असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
MCLR म्हणजे काय?
MCRL म्हणजे ग्राहकांना कर्ज देण्यासाठीचा कमीतकमी व्याजदर होय. ही पद्धत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६पासून सुरू केली आहे. ८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात २५ बेसिक पाईंटने वाढ केली असल्याने, विविध बँका व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा