

सिडको : नाशिक भेटीवर आलेले अभिनेते व सह्याद्री देवराई पर्यावरण संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी मंगळवारी उंटवाडी येथील म्हसोबा देवस्थान येथे भेट देऊन वडाच्या झाडाची पाहणी केली. उच्च न्यायालयाचे आदेश असताना मनपा जर अडीचशे वर्षे जुने असलेले ऐतिहासिक वडाचे झाड तोडण्याचा घाट घालत असेल तर या विरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील. वडाच्या पारंब्या म्हणजे हजारो झाडे आहेत ते वाचलेच पाहिजेत. सह्याद्री देवराई संस्थेचा या लढ्यास पाठिंबा असल्याचे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
यावेळी सयाजी शिंदे म्हणाले की, पर्यावरणप्रेमींना राजकारण करायचे नाही. झाडाचे मतदान झाले असते तर त्यांना कुणी हात लावला नसता. विकास करा पण झाड तोडता कामा नये. मनपा आयुक्तांनी यावर विचार करावा, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
तसेच नाशिकला ऐतिहासिक वारसा आहे. ब्रम्हगिरी व डोंगररांगावर मुलांचे वाढदिवस साजरे करा अन् झाडे लावा. आठवण पण राहील अन् ब्रम्हगिरी पण वाचेल, असेही सयाजी शिंदे म्हणाले. राष्ट्रीय वृक्ष कापले जाते. ही विकृती थांबलीच पाहिजे, झाडांसाठी लढणार्या नाशिक पर्यावरणप्रेमी संघटनांच्या आम्ही पाठीशी आहोत. नाशिककरांनीही यासाठी पुढे येण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. याप्रसंगी नाशिक वृक्ष धोरण व पर्यावरणीय जाहीरनाम्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. अजिंक्य गिते, मनीष बाविस्कर, मनोज साठे, अंबरिष मोरे, अरविंद निकुंभ, रमेश अय्यर, भकती कोठावळे, प्रशांत परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.