former mp Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणेंसह वीस जणांवर गुन्हा दाखल

former mp Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणेंसह वीस जणांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा न्यायालयाबाहेर गर्दी करून कोरोना नियम मोडल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर सिंधुदुर्गनगरी पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आ. नीतेश राणे यांच्यापाठोपाठ नीलेश राणे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. (former mp Nilesh Rane)

मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आ. नीतेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. राणे न्यायालयाबाहेर पडत असताना पोलिसांनी आ. राणेंची गाडी थांबवली. यावरून नीलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

न्यायालयाने जामीन फेटाळताच पोलिसांनी आ. राणेंच्या गाडीला घेराव घातला असता तुम्हाला गाडी थांबवण्याचे आदेश कोणी दिले? असा सवाल करत नीलेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात. आधी आदेश दाखवा आणि गाडी थांबवा, असे नीलेश राणे यांचे म्हणणे होते. त्यांच्यासोबत बरेच कार्यकर्तेही उपस्थित होते.

former mp Nilesh Rane : नितेश राणेंना दोन दिवसांची कोठडी

याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी नीलेश राणेंसह, दादा साईल, आनंद शिरवलकर, संदीप मेस्त्री यांच्यासह 15 ये 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुदुर्गनगरीचे अतिरिक्‍त पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी दिली.

दरम्यान, आ.वैभव नाईक यांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी रात्री केली होती.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा दाखल झालेले भाजपचे आमदार नितेश राणे हे अखेर स्वतःहून बुधवारी दु. 3.15 वा. कणकवली दिवाणी न्यायालयास शरण गेले. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा शरण अर्ज स्वीकारत त्यांना न्यायालयीन कोठडीत घेत पोलिस व सरकारी वकिलांना कोठडीबाबत काही म्हणणे असल्यास ते मांडण्याबाबत नोटीस दिली.

त्यानंतर कणकवली पोलिसांनी आ. राणे यांच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही सरकारी पक्षाच्या वतीने ऑनलाईन युक्‍तिवाद करताना पोलिसांनी मागितलेली कोठडी योग्य असल्याचे स्पष्ट केले.

अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी आ. नितेश राणे यांच्या वतीने युक्‍तिवाद करताना त्याला जोरदार आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कणकवली न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सलीम अ. जमादार यांनी आ. राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news