Sanskruti Balgude : संस्कृतीची ट्रॅव्हल डायरी, सौदीतून ‘ते’ व्हिडिओ व्हायरल

संस्कृती बालगुडे
संस्कृती बालगुडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेची ट्रॅव्हल डायरी व्हायरल झालीय. या डायरीमध्ये अनेक फोटो आणि अनेक व्हिडिओ पाहायला मिळताहेत. (Sanskruti Balgude) संस्कृती बालगुडेने रियाध येथून काही सुंदर व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती वाळवंटात भटकंती करताना दिसते. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला तिने No caption… Just feel it with me..! ?️✨♥️अशी कॅप्शन लिहिलीय. आणखी एका व्हिडिओला तिने Photo buffet…?️♥️ अशी कॅप्शन लिहिलीय.  (Sanskruti Balgude)

संस्कृतीने Jabal AlFil येथे जाऊन सुंदर फोटोशूट केलं आहे. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय-"The Elephant Rock " ? It's in the name itself, for me!! ??✨ A love-at-first-sight kinda situation… And If I could, I would just keep staring at its beauty for hours..??

हॅशटॅग सौदी अरेबिया लिहित खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.

रेड स्कर्ट, व्हाईट टॉप आणि डोक्यावर व्हाईट ट्रॅव्हल टोपी तिने परिधान केलेली दिसते. या लूकवर तिला रेड कलर लिपस्टिक शोभून दिसते. त्याचबरोबर, पायात ब्लॅक शूज आणि मोकेळे केस असा तिचा लूक लक्षवेधी दिसतोय. नेटकऱ्यांनी तिला सेनोरिटा ??? म्हणत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी फायर इमोजी शेअर केल्या आहेत.

आणखी काही व्हिडिओजमध्ये ती ब्ल्यू कलरच्या टू पीसमध्ये दिसते. ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये व्हिडिओ शेअर करत "इस बार बता, मुंहज़ोर हवा, ठहरेगी कहाँ..?!" ?️ अशी कॅप्शन लिहिलीय. " तू ही तू, तू ही तू, आरज़ू, आरज़ू…" अशी कॅप्शन लिहित तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

सौदी अरेबिया, रियाध येथून तिचे व्हिडिओ पाहायला मिळताहेत. प्रत्येक व्हिडिओत तिच्या सुंदर अदा पाहायला मिळताहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news