

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात दंगली सुरु आहेत. गृहमंत्री विरोधकांना आलेल्या धमकीची चेष्टा करतात. जो गद्दार गट आहे, त्यांचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या सेवेसाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा लावली आहे; पण महिलांवर होणारे अत्याचार, दंगलीकडे त्यांचे लक्ष नाही. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. १) माध्यमांशी बोलताना केला. (Sanjay Raut News)
या वेळी संजय राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान आणि तुम्ही आमच्या टार्गेटवर आहात. दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मुसावाला यांच्याप्रमाणे करु, असा धमकी असणारा मेसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला. या प्रकरणी संजय राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
यावर बोलताना राऊत म्हणाले की, "ठाण्यातून आलेल्या धमकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच नाव होती; पण त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही. पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी काय केले हे त्यांनी जनतेला सांगावे. ज्या गॅंगला सलमानला धमकी दिली त्याच गॅंगने मला धमकी दिली आहे. असं मला समजत आहे. पोलिसांनी पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. खरच पोलिसांनी ताब्यात घेतले असले तर मी त्यांचा आभारी आहे."
जो गद्दार गट आहे, त्यांचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या सेवेसाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा लावली आहे; पण महिलांवर होणारे अत्याचार, दंगली पाहायला लक्ष नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. विरोधकांना तुरुंगात टाकणे ते मारण्यापर्यंत हे सरकार गेले आहे. राज्यात दहशतवाद आणि दंगली सुरु आहेत. पण विरोधकही माणसं आहेत त्यांनाही कुटूंबही आहे. पण गृहमंत्री धमकीची चेष्टा करतात. उद्या महाविकास आघाडीची सभा होणार का? याबाबत बोलत असताना ते म्हणाले, "उद्या (दि.२) महाविकास आघाडीची सभा होणारच. या सभेला शिवसेना पक्षप्रमूख माननीय उद्धव ठाकरे जाणार आहेत. मराठवाड्यात जोरदार तयारी सुरु आहे."
एकजण ताब्यात
राऊत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई विरोधात कांजुर मार्ग पोलीस ठाण्यात सुनील राऊत यांनी गुन्हा दखल केला आहे. याप्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल तळेकर असं त्याचं नाव आहे.
हेही वाचा