Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan Teaser : सलमानचा हटके अंदाज तर शहनाज गिलची साऊथ इंडियन झलक

salman khan
salman khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीर्घ प्रतीक्षेनंतर 'किसी का भाई किसी की जान' (kisi Ka Bhai Kisi Ka Jaan Teaser) चित्रपटाचा टीजर आज २५ जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. टीजरमध्ये सलमान खानचा ॲक्शन अवतार पाहायला मिळाला. तर शहनाज गिलचीदेखील वेगळी झलक पाहायला मिळाली. (kisi Ka Bhai Kisi Ka Jaan Teaser) हा टीजर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सलमानचा दमदार ॲक्शन अवतार लोकांना पसंतीस उतरत आहे. सलमान खान शिवाय आणखी एक स्टार चर्चेत आहे ती म्हणजे शहनाज गिल.

टीजरमध्ये दिसली शहनाज गिल

टीझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा रोमान्स दिसला. पण, एका सीनमध्ये शहनाज गिलची झलक देखील पाहायला मिळाली. शहनाजला टीजरमध्ये पाहन फॅन्स खूप खूश आहेत. टीझरमध्ये शहनाज गिल देसी अवतारात दिसत असून ती खूप सुंदर दिसतेय.

ट्विटरवर ट्रेंड शहनाज

सोशल मीडियावर शहनाज – सलमान खानचे फोटो व्हायरल होत आहेत. ती ट्विटर वर ट्रेंडला आहे. तिचा साऊथ इंडियन अवतार फॅन्सना खूप आवडला आहे. ती घाघरा- चोळीमध्ये खूप सुंदर दिसतेय. ती स्माईल करताना दिसतेय. हा एखाद्या गाण्याचा सीन असल्याचे म्हटले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news