Anushka Sharma : अनुष्काचे बेडरुममधून फोटो व्हायरल, विराटसोबत व्हेकेशनवर | पुढारी

Anushka Sharma : अनुष्काचे बेडरुममधून फोटो व्हायरल, विराटसोबत व्हेकेशनवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’मुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्माचे नवे फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत विमानतळावर दिसले. दरम्यान, अनुष्काने (Anushka Sharma ) यलो ऑफ शोल्डर टॉपमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर फॅन्सकडून खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. अनुष्काने बेडरुममधून काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती यलो ऑफ शोल्डर टॉप आणि ब्ल्यू रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय- ‘It was all windy but the mood was sunny ☀️#IYKYK. या फोटोंना तिला खूप साऱ्या ❤️‍🔥 हार्ट आणि फायर इमोजी चाहत्यांनी शेअर केल्या आहेत. (Anushka Sharma )

दरम्यान, विराट आणि अनुष्का दोघेही विमानतळावर स्पॉट जाले. पण, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी वामिका दिसली नाही. यावेळी फोटोमध्ये अनुष्का शर्मा टी-शर्ट आणि पँट घातलेली दिसली. अनुष्का शर्माने टी-शर्टवर एक जॅकेटदेखील घातला होता. तिने टोपीदेखील घातली होती. हा लूक तिच्या फॅन्सना खूप आवडला. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा खूप क्यूट दिसतेय.

अनुष्का शर्मा या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत असून ती मीडियाला पोझदेखील देताना दिसतेय.

सोशल मीडियावर विराटचा लूक चर्चेत

अनुष्का शर्मासोबत या फोटोंमध्ये विराट कोहलीदेखील दिसत आहे. विराट कोहली या फोटोंमध्ये खूप कूल लूकमध्ये दिसत आहे. दरम्यान पोझ देताना अनुष्का शर्माच्या स्माईलने सगळेच वेडे झाले. विमानतलावर जाण्याआधी अनुष्का शर्मा मास्क लावताना दिसली. विराटनेदेखील मास्क लावलेला दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button