sajinde series
sajinde series

Sajinde web series : रोमँटिक स्टोरी ‘साजिंदे’ वेबसीरीज भेटीला

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. (Sajinde web series) बाईतलं बाईपण प्रभावीपणे मांडणारं संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असतं. त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. त्यांनी 'साजिंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणलीय. (Sajinde web series)

'व्हीमास मराठी' प्रस्तुत गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'साजिंदे' ही रोमँटिक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री कश्मिरा ताकटे, अभिनेता ऋषिकेश वांबूरकर, अमित रेखी, अभिजित दळवी, ऋषिकेश पाठारे या कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने साजिंदे या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या वेबसिरीजमधून कश्मिरा हिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. वेबसिरीजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशीने सांभाळली आहे.

याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे असे म्हणाले की, एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी 'साजिंदे' या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली.कथा माझ्याकडे तयार होती. शिवाय स्टारकास्टच्या सोबतीने ही आगळीवेगळी कथानक असलेली वेबसिरीज दिग्दर्शित केली. कथा, दिग्दर्शनासह या वेबसीरीजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली. एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news