

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' फेम आमि अभिनेत्री सई लोकूर ( Sai Lokur) सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या या व्हेकेशनचे नवनविन अनेक हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'Fantastic saii❤️', 'Beautiful ❤️'असे म्हणत अनेक कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.
नुकतेच सई लोकूर ( Sai Lokur ) व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी कुटूंबियासोबत बालीमध्ये पोहोचली आहे. बाली तेथील तिने मारा नदीची सफर, नुसा पेनिडा बेटाची सफर तिने केली आहे. याच दरम्याचे सईने प्रत्यके ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर बालीमधील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'हंडारा गेट' येथे तिने फोटोशूट केले आहे. यातील काही फोटोत ती यलो (पिवळ्या) रंगाच्या स्विमसूटमध्ये पाण्यात मौजमस्ती करताना दिसतेय. तर काही फोटोत सईचे जंगली प्राण्यांवरील प्रेम दिसून येत आहे. यातील खास म्हणजे, सईने सर्वात उंच प्राणी उंटाला पहिल्या मजल्यावरून खावू घातले आहे.
यादरम्यानचा एक व्हिडिओदेखील तिने शेअर केला आहे. यात सईच्या हातात एका हातात टेपली दिसतेय ज्यामधील काही फळे आहेत. तर उंट त्या टोपलीत तोंड घालून तिच्याजवळची फळं खाताना दिसतोय. याशिवाय सई एका हत्ती, झेब्रा आणि गेंड्याच्या जवळ जावून फोटोशूट केलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'माझा सर्वात उंच नवीन मित्र ?, त्याला पहिल्या मजल्यावरून भेटायचे होते. मोहक आणि प्रेमळ प्राणी. ❤, या सुंदर अनुभवासाठी धन्यवाद ?' आणि 'अरे हो! ते झेब्रा आणि गेंडे आहेत ?, किती अवास्तव अनुभव होता तो. माझ्या बाली सहलीतील माझा आवडता ❤.' असे म्हटले आहे. तर पाण्यात मौजमस्ती करतानाच्या फोटोला तिने 'वॉटर बेबी ?'. अशी कॅप्शन दिली आहे. या सगळ्यावरून सई बालीमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. याच दरम्यानच्या एका फोटोत सईने तिच्या पतीला मिस करत असल्याचेदेखील म्हटले आहे. सईचे हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.
हे फोटो आणि व्हिडिओ शोसळ मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'khup god distay❤️', 'Fantastic saii❤️', 'So sweet & Hot ??', 'Looking nice❤❤??', 'Wow?', 'aag?', 'Gorgeous ?', 'Nice water with nice girl', 'So cute ?', 'Perfect ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे.
सई नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे नवनविन फोटोज शेअर करत असते. 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून ती चाहत्याच्या घराघरांत पोहोचली होती. तर 'किस किसको प्यार करु' या हिंदी चित्रपटात ती दिसली.
हेही वाचलंत का?