

पुढारी ऑनलाईन : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचे निधन झाल्याचे वृत्त आज व्हायरल झाले होते. मात्र, आता झिम्बाब्वे संघातील माजी क्रिकेटपटू हेन्री ओलांगा याने एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत हीथ स्ट्रीक याचे निधन झाले नसल्याचा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की, स्ट्रीक जिवंत आहे आणि त्याच्या मृत्यूची केवळ अफवा आहे.
हीथ स्ट्रीक याचे निधन झाल्याच्या वृत्तानंतर काही तासांनंतर त्याचा माजी सहकारी हेन्री ओलांगा याने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले की, हीथ स्ट्रीक जिवंत आहे. त्याने त्याच्या नवीन पोस्टमध्ये म्हटले की "स्ट्रीकच्या मृत्यूच्या अफवा अतिशयोक्तीपूर्ण होत्या". दरम्यान, Mid-Day शी बोलताना स्ट्रीकने त्याच्या मृत्यूच्या अफवेमुळे दुःख झाल्याचे म्हटले आहे.
"मी पुष्टी करू शकतो की हीथ स्ट्रीकच्या मृत्यूच्या अफवा अतिशयोक्तीपूर्ण केल्या गेल्या आहेत. मला नुकतेच त्याच्याकडून हे कळले. थर्ड अंपायरने त्याला परत बोलावले आहे. तो जिवंत आहे," असे ओलांगाने नवीन ट्विटमध्ये म्हटले आहे.
आज सकाळी हीथ स्ट्रीकच्या निधनाविषयी जे ट्विट केले गेले होते ते आता डिलीट करण्यात आले आहे. स्ट्रीकच्या निधनाच्या वृत्तानंतर जगभरातील क्रिकेटपटूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती.
"हीथ स्ट्रीक बद्दल दुःखद बातमी. RIP @ZimCricketv लिजेंड. आमचा महान अष्टपैलू खेळाडू. तुझ्यासोबत खेळणे खूप आनंददायक होते. माझ्या गोलंदाजीचा स्पेल संपल्यावर आम्ही भेटू. ..," अशी पोस्ट यापूर्वी ओलोंगाने केली होती. त्यामुळे त्याच्या निधनाचे वृत्त सगळीकडे पसरले.
स्ट्रीक हा त्याच्या काळातील सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करताना ६५ कसोटी, १८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,९३३ धावा केल्या आणि ४५५ विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वेकडून कसोटीत १ हजार धावा आणि १०० विकेट्स आणि वनडेमध्ये २ हजार धावा आणि २०० बळी घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचे अनेक विक्रम अजूनही झिम्बाब्वेमधीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंना प्रेरणा देतात. पण त्याच्या निधनाच्या पोस्टनं आज गोंधळ उडाला
हे ही वाचा :