Nathan Coulter Nile : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Nathan Coulter Nile : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nathan Coulter Nile : राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या १५व्या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएल पॉइंट टेबलमध्येही संघ पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान (RR) सोबत सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण आता संघाला मोठा धक्का बसला आहे.

वास्तविक, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile) आयपीएलच्या १५ व्या हंगामातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. नाथनच्या बाहेर पडल्याने राजस्थान संघाला मोठा झटका बसला आहे. नॅथन कुल्टर-नाईल (Nathan Coulter Nile)ला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे समोर आले आहे. तो स्पर्धेतून बाहेर पडणे हा कर्णधार संजू सॅमसनसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. तथापि, राजस्थानने अद्याप कुल्टर नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी राजस्थानचा कोणत्या खेळाडूला संघात स्थान दिले जाऊ शकते, या घोषणेकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये राजस्थानने कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile)ला २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज कुल्टर-नाईलला ही दुखापत झाली. या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कुल्टर-नाईल खूप महागडा ठरला आणि त्याने ३ षटकात ४८ धावा दिल्या होत्या.

राजस्थानच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचे तर हा संघ अतिशय धोकादायक फॉर्ममध्ये दिसत आहे. राजस्थानच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये जोस बटलरने चमकदार कामगिरी केली आहे. तर देवदत्त पडिकल आणि कर्णधार संजू सॅमसन देखील जबरदस्त लयीत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर हा संघ या स्पर्धेत सर्वात धोकादायक गोलंदाजी करताना दिसत आहे. युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विनसारखे गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news