Rohit Sharma On Ishan Kishan : इशानला सलामीला पाठवणार की नाही? रोहितने दिले उत्तर, म्हणाला…
पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात इशान किशनाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाणार आहे. मात्र तो मधल्याफळीत फलंदाजी करेल. तर सलामीला शुबमन गिललाच पसंती असेल, असे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट मंगळवारी केले.
बुधवारपासून (दि. 18) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होत आहे. हैदराबाद येथे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर दिग्गजांसह चाहत्यांचे लक्ष लागले होते. आपल्या शेवटच्या वन-डेत द्विशत फटकावणा-या इशानला संधी मिळेल की नाही याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यावर कर्णधार रोहितने खुलासा करत इशानला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल असे सांगत त्याला सलामीला न पाठवता मधल्या फळीत खेळावे लागेल असे स्पष्ट केले. सलामीसाठी त्याने शुभमन गिललाच पसंती दिली.
हेही वाचा;

