

न्यूयॉर्क : जगभरात अनेक प्रकारचे रोबो (Robo Lawyer) विकसित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये स्वयंपाक करणार्या रोबोपासून ते रुग्णावर शस्त्रक्रिया करणार्या रोबोपर्यंत हरेक प्रकारच्या रोबोंचा समावेश होतो. आता तर चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने न्यायालयात युक्तिवाद करू शकणारा रोबोही विकसित करण्यात आला आहे. इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक यांच्यापाठोपाठ आता हा 'वकील' रोबोही बनला आहे!
आटिफिशियल इंटेलिजन्स असलेला असा रोबो वकील (Robo Lawyer) फेब्रुवारीमध्ये आपला पहिला खटला लढवणार असल्याचेही आता सांगितले जात आहे. पण या खटल्याची नेमकी तारीख किंवा कोर्टाबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जगातील या पहिल्या आटिफिशियल इंटेलिजन्स रोबोला 'डू नॉट पे' स्टार्टअपने तयार केला असून, हा रोबो फोनवरून नियंत्रित करता येणार आहे. शिवाय रिअल टाईममध्ये कोर्टाचे सर्व युक्तिवादही तो ऐकू शकणार आहे. जगातील पहिला रोबो वकील पुढील महिन्यात आपल्या अशिलासाठी केस लढणार आहे. हा रोबो हेडफोनद्वारे आपल्या अशिलास सुनावणीदरम्यान त्याला काय म्हणायचे आहे ते सांगेल.
या चॅटबॉटचे नाव 'डू नॉट पे' आहे आणि तो जोशुआ ब्राऊडरने 2015 मध्ये तयार केला होता. यापूर्वी तो केवळ ग्राहकांना थकलेली फी आणि दंडाची माहिती देण्याचे काम करायचा. परंतु, आता तो केसदेखील लढवणार आहे. जोशुआ ब्राऊडर यांनी सांगितले की, युरोपीय न्यायालयात मानवी हक्कांसाठी लढणारे अनेक चांगले वकील (Robo Lawyer) आहेत; पण त्यांची फी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, चॅटबॉटद्वारे केस लढणे खूपच स्वस्त होईल कारण कागदपत्रांसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. केसनुसार त्याची फी 20 हजार ते 1 लाखापर्यंत असू शकते.
हेही वाचा :