

नवी दिल्ली : Richest Woman in India : 'फोर्ब्ज इंडिया'ने गेल्या आठवड्यात देशातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून, यादीत नव्याने सोळा जणांची भर पडली आहे. पैकी तीन महिला आहेत. 'फोर्ब्ज इंडिया'च्या यादीनुसार, देशातील सर्वांत श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, विनोद राय गुप्ता आणि लीना तिवारी यांचा समावेश होतो.
'फोर्ब्ज'च्या आकडेवारीनुसार, जिंदाल समूहाच्या अध्यक्ष सावित्री जिंदाल या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला उद्योगपती आहेत. 73 वर्षीय सावित्री या देशातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर (1.43 लाख कोटी रु.) आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा 94 वा क्रमांक लागतो. इरोहिका सायरस या दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत.
56 वर्षीय रोहिका यांची एकूण संपत्ती सात अब्ज डॉलर (57,380 कोटी रु.) आहे. रोहिका या कॉर्पोरेट जगतात स्वत:ची वेगळी ओळख टिकवून आहेत. त्या काही पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव असणारे दिवंगत पल्लोनजी मिस्त्री हे त्यांचे सासरे होत. 'बिग बुल' या नावाने ओळखल्या जाणार्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा यांचाही देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत चौथा क्रमांक आहे. 59 वर्षीय रेखा यांची एकूण संपत्ती 5.1 अब्ज डॉलर (41,813 कोटी रु.) आहे. विनोद राय गुप्ता या 'हॅवेल्स इंडिया'च्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांच्या मातोश्री आहेत.
'फोर्ब्ज'च्या मते, 78 वर्षीय विनोद राय गुप्ता यांची एकूण संपत्ती 3.9 अब्ज डॉलर (32 हजार कोटी रु.) असून, त्या देशातील चौथ्या सर्वांत श्रीमंत महिला उद्योगपती ठरल्या आहेत. देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत महिला ठरण्याचा मान लीना तिवारी यांना मिळाला आहे. त्या 'यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड'च्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 27,876 कोटी रुपये आहे.
हे ही वाचा :