

पुणे : पुढरी वृत्तसेवा : सीबीएसई च्या अभ्यासक्रमातून फाळणीचा रक्तरंजित इतिहास काढा, महाराष्ट्र शासनाने आपले मत सीबीएसई बोर्डाला आपले याबाबतचे मत कळवावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. धनकवडी येथील सरहद पब्लिक स्कूलच्या नव्या इमारतीचे उदघाटन पवार यांच्या उपस्थितीत झाले ते यावेळी बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले,की फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. तो सीबीएसई च्या अभ्यासक्रमात शिकवला जात आहे. पण त्यामूळे नव्या पिढीवर विपरीत परिणाम होत आहेत. हा इतिहास सीबीएसई ने अभ्यासक्रमातून काढला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने या बाबत आपले स्पष्ट मत या बोर्डाकडे कळवावे अशी सूचना पवार यांनी केली.
हेही वाचा :