लडाखमध्ये जगातील सर्वात उंचावरील रस्त्याचे काम सुरू | पुढारी

लडाखमध्ये जगातील सर्वात उंचावरील रस्त्याचे काम सुरू

गंदेरबल : पूर्व लडाखच्या दुर्गम भागात लिकारू ते फुकचे या 64 किमी लांबीच्या जगातील सर्वात उंचावरील रस्ता निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. फुकचे हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 3 किमी अंतरावर आहे.

लडाखच्या अनेक भागांत रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आले आहे. त्यात लिकारू ते फुकचे या रस्त्याचा समावेश आहे. त्यातील फुकचे हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तीन किमी अंतरावर आहे. हा रस्ता जगातील सर्वात उंचावरील रस्ता ठरणार आहे. समुद्रसपाटीपासून 19 हजार 400 फुटांवर हा भाग येतो. सध्या उमलिंग्ला पास हा 19 हजार 24 फूट उंचीवरील रस्ता जगातील सर्वात उंचावरील रस्ता आहे. उमलिंग्ला पास हा 52 किमीचा रस्ता असून तो चिशुम्ले ते डेमचोक यांना जोडणारा आहे. डेमचोक हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. या रस्त्याचे कामही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननेच केले आहे.

हेही वाचा :

Back to top button