जडेजा गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे संघाबाहेर होता; पण आता तो संघात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठीही भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यांमध्ये जडेजाचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असले तरीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. (Ravindra Jadeja)