गुड न्यूज ! व्हॉट्स ॲपवर लवकरच पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचा फोटो आणि बरंच काही… | पुढारी

गुड न्यूज ! व्हॉट्स ॲपवर लवकरच पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचा फोटो आणि बरंच काही...

पुढारी ऑनलाईन: सध्याच्या घडीला जगामध्ये मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये व्हॉट्स ॲप वापरत नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. व्हॉट्स ॲपही आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या सुविधा देत असते. वापरकर्त्यानांही व्हॉट्स ॲपकडून येणाऱ्या नवनवीन अपडेट्सची उत्सुकता असते. आता व्हॉट्स ॲप वापरकर्त्यांसाठी भन्नाट नवीन फिचर घेऊन येत आहे.

व्हॉट्स ॲपने अलीकडेच त्यांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर काही नवीन फिचर जोडली आहेत. या नवीन फीचरमध्ये फॉरवर्ड मीडिया विथ कॅप्शन, कम्युनिटी सपोर्ट आणि आणखी काही गोष्टींचा समावेश आहे. सध्या कंपनी एका नवीन फिचवर काम करत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना इमेजेस त्यांच्या ओरिजिनल क्वालिटीत पाठविण्यास अनुमती देईल.

WABetaInfo च्या अहवालानुसार, कंपनी ड्रॉईंग टूलमध्ये एक नवीन फिचर जोडण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही इमेजची क्वालिटी बदलता येईल. व्हॉट्स ॲप बीटा व्हर्जन 2.23.2.11 अपडेटवर चालणाऱ्या अँड्रॉइडवरील व्हॉट्स ॲप बीटा वापरकर्ते हे फिचर वापरू शकणार नाहीत. कारण ते सध्या विकासाधीन आहे आणि ॲप भविष्यातील अपडेट्ससह लवकरच रोल आउट केले जाईल.

सध्या व्हॉट्स ॲप आपल्या वापरकर्त्यांना हाय रिझोल्यूशन इमेजेस डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये रूपांतरित करून शेअर करण्याची परवानगी देते. हे अपडेट रोल आउट झाल्यानंतर वापरकर्ते कोणालाही इमेजेस पाठवण्यापूर्वी त्याची इमेज क्वालिटी कॉन्फिगर करू शकणार आहेत.

व्हॉट्स ॲप ‘ चॅट ट्रान्सफर ‘ या फीचरवर देखील काम करत असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचे चॅट एका अँड्रॉइड स्मार्टफोनवरून दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, व्हॉट्स ॲपने एक फिचर आणले होते. ज्यामध्ये वापरकर्त्यांना मूव्ह टू iOS ॲप वापरून Android टू iOS वर चॅट हलविण्याची सुविधा दिली होती. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचा चॅट हिस्ट्री न गमावता वेगळ्या डिव्हाइसवर स्विच करण्यात मदत झाली.

हे फीचर रोल आउट झाल्यानंतर व्हॉट्स ॲप वापरकर्ते सेटिंग्जमध्ये जाऊन हे फीचर ऍक्सेस करू शकतील. AppWABetaInfo च्या अहवालानुसार, या दोन्ही फीचर्स वर सध्या प्राथमिक टप्प्यातील चाचण्या कंपनी स्थरावर सुरू आहेत. येणाऱ्या काही दिवसात वापरकर्त्यांच्या सेवेत हे दोन्ही फीचर्स दाखल होणार आहेत. यामुळे वापरकर्त्यास एका अँड्रॉइड फोनमधून दुसऱ्या अँड्रॉइड फोन मध्ये व्हाट्सअप चॅट ट्रान्स्फर करता येणार आहे. वर्तमान स्थितीत नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्स ॲप सुरू केल्यास गुगल ड्राईव्हमध्ये जावून सर्व चॅट घ्यावी लागत होती. आता याची गरज पडणार नाही. आता थेट चॅट ट्रान्स्फर या फीचर्ससह चॅट ट्रान्स्फर करता येणार आहे.

 

Back to top button