

सोलापूर : अंबादास पोळ : 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपद येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्री शक्ती जागर या विषयावर चित्ररत असेल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला श्रमाजीवी वर्गाला मानाच्या रांगेत बसवलं जाणार आहे.
यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि स्त्री शक्तीचा जागर या विषयावर साकारण्याचं काम दिल्लीत युद्ध पातळीवर सुरू आहे. या साडेतीन शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरची अंबाबाई मंदिर, तुळजापूरची भवानी मातेचे मंदिर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांचा समावेश आहे.
यावर्षीची संकल्पना रेखाचित्र आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. 30 जणांचा समावेश असलेल्या युवक मूर्तिकार आणि कलाकारांची टीम 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररत परिपूर्ण करण्याचं काम करत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात मुख्य व्यासपीठावर सर्वसामान्यांचा सहभाग असणार आहे. यात व्हीआयपी रांगेत भाजीविक्रेते, रिक्षा चालक आणि बांधकाम मजूर यांचा समावेश असणार आहे. व्हिस्टा प्रकल्पासाठी दिवस रात्र परिश्रम घेतलेले मजूर देखील विशेष आमंत्रित आहे. यंदाच्या संचालनासाठी 45 हजार आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यापैकी 32000 आसनाचे ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा आहे. कर्तव्यपथावर होणारा यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सर्वार्थाने आगळावेगळा असणार आहे.
हेही वाचा :