व्हायरल व्हिडिओ : हम बने तुम बने एक दूजे के लिए..! गाण्यावर रवी शास्त्रींचा रणवीर सिंह सोबत भन्नाट डान्स
पुढारी ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (former head coach of Indian cricket team Ravi Shastri) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ रवी शास्त्री यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रवी शास्त्री रणवीर सोबत डान्स करताना दिसत आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा (New Year celebrations) हा व्हिडिओ आहे.
'हम बने तुम बने एक दूजे के लिए…' गाण्यावर शास्त्री हे ८३ चित्रपटाचा अभिनेता रणवीर सिंह सोबत डान्स करताना दिसत आहेत. शास्त्री यांनी रणवीरला टॅग करत कॅप्शन लिहिले आहे की, डान्स टीप्स बद्दल रणवीर सिंहचे धन्यवाद! २०२० हे वर्ष तुम्हा प्रत्येकासाठी एक अद्भुत, निरोगी आणि प्रेरणादायी वर्ष असेल'. रवी शास्त्री यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे तो ८३ चित्रपटाच्या प्रीमियर नाइटचा आहे.
शास्त्री यांचा टी२० वर्ल्ड कप नंतर भारतीय पुरुष क्रिकेट टीम सोबतचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. शास्त्रींना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मधील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये टी२० वर्ल्ड कप पर्यंत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून होते. रवी शास्त्री यांच्या नंतर राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.
हे ही वाचा :
- आजपासून मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू, घरबसल्या असा बुक करा तुमचा स्लॉट
- Ravindra Jadeja : अल्लू अर्जुनच्या अवतारात दिसला रविंद्र जडेजा, पुष्पा डायलॉग व्हायरल, पहा व्हिडिओ
- Viral video : गेटवरुन उडी घेत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला अन् त्यानंतर जे घडलं ते थरारकच!
- viral video : हुंडा मागितल्याने लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, नवऱ्याला चोपला!

