ratris khel chale 3: कावेरी-अभिराम यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

sainkeet kamat-bhagya nair
sainkeet kamat-bhagya nair
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात कावेरी-अभिराम हा नवा चेहरा पाहायला मिऴाला. कावेरी-अभिराम यांनी या मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारलीय. keveri चे खरे नाव भाग्या नायर असे आहे. तर abhiram चे खरे नाव साईकित कामत असे आहे. या मालिकेतील दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झालाय.

ती या व्हिडिओत ती सुंदर साडी नेसलेली दिसते. केसात गजरा माळलेला दिसतो. भाग्याच्या इन्स्टाग्राम अकाऊँटवर हा व्हिडिओ पाहायला मिळतो. कावेरी-अभिराम यांचा Hie Snehithane? गाण्यावर हा रोमँटिक व्हिडिओ आहे.

रिअल लाईफमध्ये बोल्ड आहे भाग्या

तिने एकांकिकांमध्ये काम केलंय. ती युट्यूबरदेखील आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिराम याच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसतेय. मालिकेत ती kaveri चं पात्र साकारतेय. अवघ्या काही कालावधीत तिला लोकप्रियता मिळाली.
रिअल लाईफमध्ये भाग्या सुंदर आणि बोल्डही आहे. तिला विविध ठिकाणे फिरायलाही आवडतात. इन्स्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक फोटो पाहायला मिळतात.

तिने रंगभूमीवर देखील काम केलंय. तिचा हा प्रवास कॉलेजपासून सुरू झाला. युथ फेस्टिव्हलमध्येही ती सहभागी व्हायची. 'मादी' ही एकांकिका तिने सादर केली होती. येथूनचं तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली.

युथ फेस्टिव्हल, इप्टा, आयएनटी अशाअनेक एकांकिका स्पर्धेत तिने सहभाग घेतलाय. एकांकिका करत करत नाटकांमध्येही दिसणारी भाग्या यू-ट्यूबर झाली. 'स्कूल फ्रेंड क्रश' आणि 'कुछ मिठा हो जाये' या युट्यूब वेब सीरिजने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

दरम्यान, तिने मॉडेलिंगदेखील केले. याचवेळी तिला 'रात्रीस खेळ चाले ३' या मराठी मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेतील kaveri ही तिची भूमिका दाक्षिण्यात दाखवण्यात आलीय. पण, खरंतर, ती सेटवर मालवणी बोलण्याचा प्रयत्‍न करतेय. तिचा मालवणी भाषेतील एक व्हिडिओदेखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतो.

कोण आहे abhiram?

याचं मालिकेत कावेरीच्या पतीची भूमिका abhiram म्हणजेच साईंकित कामतने साकारलीय. साईंकितचा जन्म ७ ऑगस्ट १९९५ ला झाला. तो मुळचा गोव्याचा आहे.

त्याचे शालेय शिक्षण हे Pragati Secondary Highschool, Goa येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण Peoples Secondary Hignschool, Goa येथे झाले आहे. पुढे त्याने थिएटर आर्ट्समध्ये पदवी घेतलीय.

रात्रीस खेळ चाले नंतर २०१७ मध्ये तो 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत दिसला होता. २०१९ मध्ये साईंकितने मिरांडा हाऊस चित्रपटात काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news