रंग माझा वेगळा : अनघा भगरे रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड

anaghaa bhagare aka shweta
anaghaa bhagare aka shweta
Published on
Updated on

रंग माझा वेगळा या मालिकेतून अनघा भगरे प्रकाशझोतात झाली. तिने या मालिकेत श्वेताची व्यक्तीरेखा साकारलीय. अनघा भगरे हॉट अंदाजासाठी ओळखली जातेय. दीपा आणि कार्तिक यांच्या आयुष्यात वाद निर्माण करणारी श्वेताविषयी माहिती आहे का?

तिने रंगभूमीवरदेखील काम केलंय. ती फिटनेस फ्रिक आहे. अनघाचा जन्म २४ जून १९९४ रोजी नाशिकमध्ये झाला. बालपणापासूनचं तिला अभिनयाची आवड होती.

अनघा ही ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजींची मुलगी आहे. अनघाने अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून काम केले होते.

ती मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिचे आई-बाबा दोघंही नोकरी करतात. आई मोहिनी अतुल भगरे शिक्षिका आहे. तिला लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड आहे.

आईने मला स्वावलंबी बनवलं. आई-बाबांनी खूप कष्ट घेतले. मला लहानाचं मोठं केलं. आईच्या हाताची भरली वांगी आणि बाजरीची खिचडी मला आवडते. अगदी लहानपणीच तिनं मला स्वयंपाक करायलाही शिकवलं आहे, असं भगरे म्हणते.

आईचे भरभरून कौतुक

रंग माझा वेगळा या मालिकेत तिची पहिलीच भूमिका आहे. आई माझ्या भूमिकेचे कौतुक करताना चुकाही सांगते, असं भगरे म्हणते. संवाद कसे म्हणायचे ते अगदी छोट्या गोष्टींदेखील ती सांगते. आईच्या पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात आले, असे ती म्हणते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Tulpule (@rt_studioz)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news