Rakul-jackky Wedding
Rakul-jackky Wedding

Rakul-jackky Wedding: भरगच्च दागिने अन्‌ पिंक लेहंगा, जॅकी भगनानी-रकुलचे लग्नाचे फोटो पाहा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानी यांनी काल गोव्यातील एखा हॉटेलमध्ये लग्न केले. कुटुंबीय (Rakul-jackky Wedding) आणि जवळच्या मित्रांमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. परदेशातील वेडिंग डेस्टिनेशन रद्द करून दोघांनी भारतातचं लग्न करण्याचे ठरवले होते. त्यानुसार, २१ फेब्रुवारीला दोघांचे लग्न झाले. (Rakul-jackky Wedding)

संबंधित बातम्या – 

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर फेरे घेतले. या जोडप्याने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघे खूप सुंदर दिसत आहेत. फोटोंवर खूप कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. रकुलने तिच्या खास दिवसासाठी भरगच्च दागिने, मॅचिंग चुरा आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. जॅकीने गुलाबी शेरवानी घातली होती. या दोघांच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. फॅन्स त्यांना सोशल मीडियावरून अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत.

जॅकीने फोटो पोस्ट करत लिहिले -Jaan da wedding love you. ♥️ #rakulpreet #jacckybhagnani

मृणाल ठाकूर, सामंथा रुथ प्रभू, राशि खन्ना, काजल अग्रवाल, परिणीती चोप्रा, रितेश देशमुख, प्रज्ञा जैस्वाल, वाणी कपूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल आणि जॅकीचे आउटफिट तरुण ताहिलियानी यांनी डिझाईन केले होते. या जोडप्याने शीख धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि नंतर सिंधी धर्मानुसार लग्न केले.

रकुल आणि जॅकीच्या लग्नाला अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, टायगर श्रॉफ, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लग्नानंतर मीडियाला भेटून पोझ दिली. यावेळचे फोटोदेखील व्हायरल झालेले दिसताहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news