Prasad Jawade : लग्नानंतर बायकोचा पायगुण कमाल; प्रसाद जवादेने अमृताचे केले कौतुक | पुढारी

Prasad Jawade : लग्नानंतर बायकोचा पायगुण कमाल; प्रसाद जवादेने अमृताचे केले कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसाद जवादे टीव्ही मालिकांमधील लाडका चेहरा ‘पारू’ या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत आहे. तो आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे. प्रसाद सोबत त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि नवीन आयुष्याबद्दल गप्पा मारताना खूप गोष्टींवर त्याने प्रकाश टाकला. नवीन वर्ष, नवीन मालिका आणि नवीन जीवनाची सुरवाती बद्दल बोलताना प्रसादने सांगितले, “मी तर हेच सांगेन की माझ्या बायकोचा पायगुण कमाल आहे. वर्षाची सुरुवातच कामाने झाली. या मालिकेचं शूट साताऱ्यात होतंय आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदाच इतक्या दूर शूट करतोय. पण, अमृताची साथ आहे तर हा नवीन प्रवास नक्कीच यशस्वी होणार यात मला शंकाच नाही. आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Prasad Jawade ) माझा मित्र-परिवार तर हेलिकॉप्टरच्या माझ्या एन्ट्री शॉटवर एकदम फिदा आहे. एक श्रीमंत घराण्याचा मुलगा पण आपल्या आईच्या शब्दाबाहेर नसणारा अशी व्यक्तीरेखा आहे. माझी आई आणि अमृताची आई दोघी अतिशय खुश आहेत की मी पुन्हा झी मराठीवर दिसणार आहे. (Prasad Jawade)

संबंधित बातम्या –

माझ्यासाठी झी मराठीवर काम करणे म्हणजे घरी परतण्यासारखे आहे. आदित्य एक श्रीमंत घरातला मुलगा आहे तर त्याचा लुक जबरदस्तच असला पाहिजे. मी काही महिन्यापासून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरवात केली आणि प्रोमो आणि शो मध्ये ती मेहनत दिसून येत आहे म्हणून मी संतुष्ट आहे. आदित्य किर्लोस्करच्या खूप शेड्स आहेत जसा-जसा शो पुढे जाईल तुम्हाला कळेलच. प्रसाद आणि आदित्य मध्ये काही साम्य गोष्टीही आहेत. त्या दोघांमध्ये सगळ्यात मोठं साम्य म्हणजे आईवर प्रचंड प्रेम करतात. आदित्यला महागड्या आणि स्टयलिश गाड्यांचा खूप शोक आहे आणि प्रसादला ही स्पोर्ट्स कार खूप आवडतात. प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत जितकं प्रेम देत आलात त्याहुन जास्त प्रेम या भूमिकेला आणि ‘पारू’ ला द्या.

‘पारू’ सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वाजता पाहता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)

Back to top button