

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री राखी सावंत याच्या आई जया सावंत यांचे निधन झाले. त्यांच्यावर टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखी सावंत यांच्या आई जया यांचे ब्रेन ट्यूमरने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती राखी सावंत यांचे पती आदिल खान यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आईच्या प्रकृतीची वेळोवेळी अपडेट देत होत्या. हे सांगताना राखीला अनेकवेळा अश्रु अनावर झाले होते.
राखीच्या आई जया यांच्यावर रविवारी (दि.२९) अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती राखीने इंस्टाग्रामवरून दिली आहे. राखीच्या आईच्या निधनावर अभिनेता जॅकी श्रॉफ, मान्यता दत्त, अली गोनी आणि रश्मी देसाई यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी राखी आणि तिच्या कुटुंबियांचे सात्त्वन केले आहे.