

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राकेश कुमार यांचे मुंबईत निधन झाले. प्रसिद्ध लेखक म्हणून देखील त्यांची ख्याती होती. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक राकेश कुमार यांचे गुरूवारीच (दि. १०) निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. कर्करोगाच्या आजाराशी ते झुंज देत होते. या दिग्दर्शकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. (Rakesh Kumar)
राकेश कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर सिनेसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. रविवारी (दि. १३) त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या लोखंडवाला (अंधेरी पश्चिम) येथील द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, मैदान नं. ५ येथे ही शोकसभा पार पडेल. (Rakesh Kumar)
अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून राकेश कुमार यांना ओळखले जाते. 'खून पसिना', 'मिस्टर नटवरलाल', 'याराना', 'जॉनी आई लव यू', 'दिल तुझको दिया', 'कमांडर', आणि 'सूर्यंवशी' (१९९२) यासारखे प्रसिद्ध चित्रपट त्यांनी बनवलेले आहेत. १८ ऑक्टोबर १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
हेही वाचा