दिल्लीत ४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्र ‘भागीदार राज्य’! | पुढारी

दिल्लीत ४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्र ‘भागीदार राज्य’!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) यंदा महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ होण्याचा मान मिळाला आहे. मेळाव्यासाठी ‘महाराष्ट्र दालन’ सज्ज होत आहे. वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदाचा व्यापार मेळावा राहील. महाराष्ट्र याच संकल्पनेवर आपल्या विकासाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन साकारत आहे. याच मध्यवर्ती संकल्पनेवर देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवणार आहेत. यानिमित्त मेळयातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) होणार आहे.

१४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदान येथे ४१ व्या ‘आयआयटीएफ’मध्ये डिज‍िटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र (क्लस्टर), स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसणार आहेत. एकूण ४५ स्टॉल्स याठ‍िकाणी मांडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवर स्टॉल्स राहतील. यासह बचत गटांचे, काराग‍िरांचे, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगातंर्गत येणारे उद्योग समूहचे (क्लस्टर),स्टॉर्टअपचे स्टॉल्स असणार आहेत. मेळाव्याचे मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र भागीदार राज्य असल्याने मुख्य कार्यक्रमात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील.

हेही वाचा 

कोल्‍हापूर : हसन मुश्रीफ यांनी बंद पाडले कागलमधील बेकायदा लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात; भारत जोडो यात्रेत रंगला कुस्तीचा फड (पहा व्हिडिओ)

स्टीव्ह जॉब्सच्या सँडलचा लिलाव, बोली ऐकून उडेल ‘होश’

 

Back to top button