Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांनी एका दिवसात कमवले ६ हजार कोटी रुपये, मात्र ‘स्‍टार हेल्‍थ’ गुंतवणूकदारांची निराशा

Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांनी एका दिवसात कमवले ६ हजार कोटी रुपये, मात्र ‘स्‍टार हेल्‍थ’ गुंतवणूकदारांची निराशा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राकेश झुनझुनवाला ( Rakesh Jhunjhunwala )  हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्‍यांनी गुंतवणूक गेलेल्‍या स्‍टार हेल्‍थ अँड अलाइड इन्‍शुरन्‍स कंपनी शेअर्सच्‍या मूल्‍यांमध्‍ये घसरण झाल्‍याने गुंतवणूकदार निराश झाले. मात्र झुनझुनवाला यांनी  एका दिवसात तब्‍बल ६ हजार कोटी रुपयांची कमाई केली.

राकेश झुनझुनवाला यांची स्‍टार हेल्‍थ अँड अलाइड इन्‍शुरन्‍स कंपनीत १४ टक्‍के भागीदारी आहे. झुनझुनवाला ( Rakesh Jhunjhunwala )  यांनी प्रति शेअर १५६ रुपयांनी 'स्‍टार हेल्‍थ'मध्‍ये गुंतवणूक केली होती. 'स्‍टार हेल्‍थ'च्‍या शेअरचा भाव ९४० रुपये पोहचल्‍याने झुनझुनवाला यांनी एका दिवसात तब्‍बल ६ हजार कोटी रुपयांची कमाई केली.

गुंवणूकदारांची निराशा

स्‍टार हेल्‍थ अँड अलाइड इन्‍शुरन्‍स कंपनी शेअरची दोन्‍ही भांडवली बाजारात नकारात्‍मक सुरुवात झाली. इश्‍यू प्राईसच्‍या तुलनेत ६ टक्‍के कमी दराने नोंद झाल्‍याने गुंतवणूकदरांना नुकसान सोसावे लागले. स्‍टार हेल्‍थचा शेअर इश्‍यू प्राईसच्‍या तुलनेत ६.११ टक्‍के सवलतीत ८४८.८० रुपयांवर सूचीबद्‍ध झाला. त्‍याची नोंद ८४५ रुपयांना झाली. आयपीओसाठी कंपीनने प्रती शेअर ९०० रुपये निश्‍चित करण्‍यात आली होती. दिवसभरात स्‍टार हेल्‍थचा शेअर ९४० रुपयांच्‍या उच्‍चांकीवर पोहचला. शेअर बाजार बंद झाला तेव्‍हा ९०१ रुपयांच्‍या भावावर बंद झाला.

भारतातील रिटेल हेल्‍थ इन्‍शुरन्‍समधील गुंतवणूक सातत्‍याने वाढत आहे. मी या क्षेत्राबाबत आशावादी आहे. त्‍यामुळेच मी एकही शेअरची अद्‍याप विक्री केलेली नाही, असे झुनझुनवाला यांनी सांगितले.

राकेश झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील दिग्‍गज गुंतवणूकदार आहेत. चार्टर्ड अकाैटंट (सीए) असणारे झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेले शेअर वधारताेच, असे गुंतवणूकदार मानतात. देशातील श्रीमंत ५० व्‍यक्‍तींच्‍या यादीत झुनझुनवाला यांचा समावेश आहे.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news