

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : देशातील आघाडीचे उद्योजक गौतम अदानी यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण से- नेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अर्धा तास चाललेल्या या भेटीनंतर तासाभरातच राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. या भेटींनी राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्क लढविले जात आहेत. अदानी उद्योग समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा जिंकली आहे. या महाकाय प्रकल्पावर अदानी व राज यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय निरीक्षक त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. (Raj Thackeray News )
राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाल्यानंतर त्यावर दिवसभर राजकीय चर्चा सुरू होत्या. त्यातच सायंकाळी अदानी ठाकरे आणि ठाकरे फडणवीस भेटीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी अदानींचे कौटुंबिक स्वागत झाले. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित आदी उपस्थित होते. मात्र, या भेटीबाबत कोणताही तपशील मनसेकडून देण्यात आलेला नाही.
दरम्यान, शिवतीर्थावरून अदानी गेल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर या शासकीय निवासस्थानी दाखल झाला. या दोन्ही भेटींमध्ये काही समान धागा आहे का, असा प्रश्न आहे. अलीकडेच गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर काही महिन्यांपूर्वी दिवाळीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मातोश्रीवरही गेले होते. विशेष म्हणजे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आणि अदानीद- ेखील भेटले होते. या भेटीची सर्वच भेटींचे विषय अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे अदानी-राज आणि पाठोपाठ राज-फडणवीस यांच्या भेटीचे विषयदेखील इतक्यात समोर येण्याची शक्यता कमी दिसते.
हेही वाचा