Shehla Rashid : शेहला रशीदला भारतीय लष्कराविरुद्ध ट्विट करणे भोवणार, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी खटला चालवण्यास दिली मंजुरी

Shehla Rashid : शेहला रशीदला भारतीय लष्कराविरुद्ध ट्विट करणे भोवणार, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी खटला चालवण्यास दिली मंजुरी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्कराविरुद्ध केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनची (जेएनयूएसयू) माजी उपाध्यक्षा शेहला रशीदच्या (Shehla Rashid) अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी मंगळवारी शेहला रशीदवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयाचा हवाला देत आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. 18 ऑगस्ट 2019 रोजी तिने भारतीय लष्कराबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली होती. शेहलाने एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करून भारतीय लष्करावर काश्मिरी नागरीकांवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत या ट्विट प्रकरणी शेहलाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. भारतीय लष्करानेही स्पष्टीकरण देताना शेहलाचे आरोप फेटाळून लावले. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.

फेब्रुवारी 2016 मध्ये, जेएनयूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, तेव्हा शेहला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनची उपाध्यक्ष होती. तर कन्हैया कुमार अध्यक्ष होता. देशविरोधी घोषणांप्रकरणी कन्हैयाला तुरुंगात जावे लागले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news