

पुढारी ऑनलाईन: पुढच्या तीन ते चार तासात मुंबईसह, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊसाची दाट शक्यता आहे. या जिल्हयात पुढच्या ३ ते ४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, असा इशारा हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीतून सांगितला असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
महाराष्ट्रात पुढील ५ दिवसांसाठी IMD कडून हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपचा पाऊस पडणार आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या राज्यातील काही जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यतेचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.
पर्व विदर्भ आणि मध्यप्रदेशच्या आजूबाजूच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे विर्भात देखील आज (दि.३०) पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस होणार आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर येथे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस स्वरूपाचा तर वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती येथे निर्जन ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.