

पुढारी ऑनलाईन डेस्क:
काँग्रेसचे माजी अध्यक्षा राहुल गांधी यांनी आज मानसा जिल्ह्यातील मुसा गावात जावून सिद्धू मूसेवाला यांच्या पालकांची भेट घेतली. यावेळी मूसेवाला ( Sidhu Moosewala ) यांच्या वडिलांची गळाभेट घेत त्यांनी त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, मुसेवालांच्या मारेकर्यांना वकिलपत्र देण्यात येणार नाही. तसेच मुसेवाला कुटुंबीयांच्या वतीने नि:शुल्क खटला लढला जाईल, अशी घोषणा मानसा जिल्हा बार असोसिएशनने केली आहे.
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मानसा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आम आदमी पार्टीच्या सरकारने मूसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली. यानंतर २४ तासांमध्येच मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सोमवारी राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि हरियाणा आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता व माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांनही मुसेवाला कुटुंबीयांची भेट घेतली होती.
मुसेवाल यांच्या वडिलांनी रविवारी केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मारेकर्यांना फाशी देण्यात यावी. केंद्र सरकारने याप्रकरणी राज्य सरकारला सूचना द्यावेत अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :