Latest
राहुल गांधींचा अपमान, नविका कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा मोर्चा
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल असंसदीय भाषा वापरून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ नविका कुमार यांच्याविरोधात मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष जीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
मुंबई युथ काँग्रेसतर्फे मुंबईतील कमला मिल्स कंपाउंड, लोअरपरेल येथील कार्यालयावर याबद्दल आज बुधवारी (दि.२९) रोजी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुंबई युथ काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे नविका कुमार यांनी राहुल गांधी यांची ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली असल्याची माहिती मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष जीशान सिद्दीकी यांनी दिली.
हेही वाचलंत का?
- अश्विन- मॉर्गन वाद : दिनेश कार्तिकने सांगितले वादाचे कारण
- 'सुराज इंडिया ट्रस्ट' चे अध्यक्ष न्यायालय अवमान प्रकरणी दोषी, २५ लाखांचा दंड वसूल करण्याचे सर्वोच्च न्यालयाचे निर्देश
- shaheen cyclone : गुलाब पाठोपाठ आता शाहीनचा धोका वाढला, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
- इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगेला महापूर
- दसरा चौक येथे मृत्यूचे सापळे बनलेल्या खड्ड्यांच्या अनोखे फोटो प्रदर्शन
पाहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

