

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय हवाई दलापाठोपाठ भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यासाठी फ्रान्समधील राफेल एम या लढाऊ विमानाची निवड केली आहे. मार्चमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ भारत दौर्यावर येणार आहेत. या दौर्यातच राफेल एम खरेदी व्यवहारावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे मानले जाते. अमेरिकेच्या जेट एफ/ए-18 सुपर हॉर्नेटचा पर्यायही भारतीय नौदलासमोर होता; पण एकूण क्षमता पाहून राफेल एमची निवड नौदलाने केली. (Rafale M Fighter)
राफेल एम नौदलाच्या आयएनएस विक्रांतवर तैनात होईल, अशी शक्यता आहे. ग्रीस, इंडोनेशिया आणि यूएईच्या फौजांमध्ये राफेल एम आधीच दाखल झाले आहे. अमेरिकन आणि फ्रेंच अशा दोन्ही विमानांची ट्रायल गोव्यातील आयएनएस हंसा या तळावर नौदलाने घेतली होती. नौदलाकडे सध्या असलेली रशियन बनावटीची 43 युद्ध विमाने जुनी झालेली आहेत.
राफेल एमची वैशिष्ट्ये
अधिक वाचा :