अजय देवगण-ज्योतिकासोबत आर माधवन घेऊन येतोय “शैतान”

आर माधवन
आर माधवन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर माधवनने अजय देवगण आणि ज्योतिकासोबत त्याच्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलरचे पहिले पोस्टर शेअर केलं आहे. आर माधवनने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं असून "शैतान" असे या चित्रपटाचे नाव आहे. ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकास बहल (सुपर ३० आणि क्वीन) दिग्दर्शित ब्लॅक मॅजिक हॉरर चित्रपटात अजय देवगण, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला देखील यात आहेत.

संबंधित बातम्या –

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वूडू बाहुल्यांची मालिका दर्शविली गेली आहे. आर माधवनचा मागील हॉरर चित्रपट 13B: Fear Has a New Address त्याच्या नवीन खरेदी केलेल्या अपार्टमेंटमध्ये एका माणसाच्या अलौकिक अनुभवांची कथा आहे.

शैतान हे जिओ स्टुडिओज अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल द्वारे प्रस्तुत केले आहे आणि देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मीत आहे. शैतान व्यतिरिक्त आर माधवनकडे शशिकांतचे क्रिकेट ड्रामा, 'टेस्ट', 'अधीरष्टसाली' आणि 'जीडी नायडू बायोपिक' हे प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news