प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित | पुढारी

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला हा भारतातील पहिला चित्रपट आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या –

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’

Back to top button