

पुढारी ऑनलाईन डेस्क
पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानने आगळीक केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा पाकिस्तानने अजनालमधील पंझग्रहिया परिसरात ड्रोनद्वारे स्फोटके फेकली. यावेळी सतर्क असणार्या सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ ) गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिलं. गोळीबारानंतर हा ड्रोन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानने ड्रोनच्या सहाय्याने स्फोटके फेकली. या परिसरात बीएसएफ जवानांनी शोधमोहित राबवली. पंझग्रहिया पसिरात दोन ठिकाणी स्फोटके आढळून आली. जवानांनी याला तत्काळ ताब्यात घेत ती स्फोटके नष्ट केली. या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तान हा सीमाभागातून वारंवार ड्रोनच्या सहाय्याने घुसखोरीचा प्रयत्न करत असतो. ड्रोनव्दारे स्फोटकांसह, अंमली पदार्थांसह अन्य संशयास्पद वस्तू फेकण्याचा प्रयत्न होतो. सतर्क असणारे भारतीय जवान धडक कारवाई करत पाकिस्तानचा डाव उधळून लावतात. डिसेंबर २०२१मध्ये पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनची घुसखोरी हणून पाडली होती. हा ड्रोन पाकिस्तानमधून आला होता. हा ड्रोन मेड इन चीनचा होता. मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनने घुसखोरीचा प्रयत्न होत आहे.
हेही वाचलं का?