

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाबरोबरच करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार्या दै. पुढारी 'एज्यु-दिशा' प्रदर्शनाची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता कायम असते. दि. २८ ते ३० मे २०२२ या कालावधीत हे प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूरसह साताऱ्यात ३ ते ५ जून, सांगली येथे १० ते १२ जूनदरम्यान या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
भविष्याचा अचूक वेध घेणारे हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्वपूर्ण टप्पा ठरतो. या वळणावर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची करिअरची दिशा ठरते. या स्थितीत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची अवस्था गोंधळलेली असते. अशा व्दिधा मनःस्थितीत सापडलेल्या विद्यार्थी व पालकांना एज्युदिशा या शैक्षणिक प्रदर्शनातून परिपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रदर्शनात नामवंत शिक्षणसंस्थांचा समावेश असून करिअर विषयक तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आपल्या शिक्षण आणि गुणवत्तेनुसार करिअरच्या अगणिक संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी संधी दै. पुढारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर करिता सनी – ९९२२९३०१८०, प्रणव – ९४०४०७७९९०, अमोल – ९७६५५६६३७७, पुणे शहरासाठी – हरिष – ९९२२९५९१०८, अभिजीत – ९७०२०१२३४९, आमरीन – ८३०८८३१६१३ , सांगली शहर – प्रशांत ८८०५००७१२६, परितोष – ८८०५००७३८३ , सातारा – मिलींद – ८८०५००७१८०, जितेंद्र – ८८०५००७६७१ या क्रमांकावर संपर्क साधवा.
हेही वाचलंत का ?