Cannes 2022 : दीपिका पादुकोणचा कान्सहून फर्स्ट लूक समोर (Video)

deepika padukone
deepika padukone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes 2022 ) मधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ग्रँड हयात कान्स हॉटेल मार्टिनेझ येथे ज्युरी सदस्यांसोबत डिनरसाठी आली असतानाचा हा लूक आहे. दीपिकाने  ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी हजेरी लावलीय. तिच्य़ा फर्स्ट लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (Cannes 2022)

कान फिल्म फेस्टिव्हल हा जगातील टॉप चित्रपट कार्यक्रमांपैकी एक आहे. ही वेळ भारतासाठी खूप खास असणार आहे. कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा एक भाग असणार आहे. ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही प्रदर्शन करणार आहे. सध्या दीपिका फ्रान्समध्ये ज्युरी म्हणून तिची उपस्थिती लावत आहे.

दीपिका पदुकोण कान्स लूक

कान्स ज्युरी सदस्यांसह हॉटेल मार्टिनेझ येथे रात्रीच्या जेवणासाठी दीपिकाने हजेरी लावली. लुई वुइटनच्या फॉल २०२१ कलेक्शनमधील सीक्विन्ड ड्रेसची निवड तिने यावेळी केली होती. तपकिरी रंगाचे उंच बूट तिने घातले होते.

दीपिका कान्स ज्युरी सदस्यांसोबत स्पॉट झाली. तिच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलचे दिग्दर्शक थियरी फ्रॅमॉक्स, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक आणि अधिकृत निवड ज्युरी सदस्य जेफ निकोल्स, ब्रिटिश अभिनेत्री रेबेका हॉल, इटालियन अभिनेत्री आणि ज्युरी सदस्य होते.

दीपिकाचा कान्स लूक व्हायरल

दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीचे चाहते तिचा हा लूक शेअर करत आहेत. कान्स इव्हेंटमध्ये जाण्यापूर्वी दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि सांगितले की, ती यासाठी किती उत्साहित आहे.

कान्समध्ये जाण्यापूर्वी शेअर केला व्हिडिीओ

दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना प्रवासाबद्दल सांगितले. तिच्या व्हिडीओच्या सुरुवातीला तिने फ्रान्सचे रस्ते, सिग्नल्स, लोक पाण्यात उड्या मारताना दाखवले Eus. याशिवाय, तिच्या फ्लाइटबद्दल सांगताना तिने सांगितले की, हा ११ तासांचा प्रवास होता आणि ती पूर्णत: झोपली होती. ती विमानतळावरून बाहेर पडताना दिसली. व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या टी-शर्ट आणि जॅकेटसह ब्लू डेनिम जीन्स घातली होती, या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती.

हेही वाचलंत का?

(photo, video : deepika.padukone.fanpage वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news