Crime Diary : गुन्हेगारांचा सणकीपणा! वाचा ‘इम्पल्स कंट्रोल डिसॉर्डर’विषयी

Crime Diary : गुन्हेगारांचा सणकीपणा! वाचा ‘इम्पल्स कंट्रोल डिसॉर्डर’विषयी
Published on
Updated on

डोक्यात तिडीक भरली आहे असे आपल्याला बरेच वेळा वाटून जाते. अनेक वेळा अनेक गोष्टींची तिडीक अनेकांच्या आयुष्यात येऊन गेलेली असते. एक प्रकारचा सणकीपणा त्याच्यामध्ये असतो. हा सणकीपणा हा अचानक उद्भवत नाही. सणक निर्माण होण्यामागे एक साखळी असते. विचारांची साखळी. अगदीच स्पष्ट बोलायचे ठरवले, तर अविचारांची साखळी.. रोगट विचारांची साखळी. (Crime Diary)

कंट्रोल डिसॉर्डर : गुन्हेगारांमध्ये जेव्हा अशा रोगट विचारांची साखळी तयार होते तेव्हा त्यांच्या मनात सणकीपणाचा उदय होतो आणि तिडीक निर्माण होते. एक प्रकारची सुरसुरी किंवा ऊर्मी ही जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा आपण ते नियंत्रित करतोच असं नाही. गुन्हेगारांमध्ये अशी सुरसुरी निर्माण होणे आणि ती कंट्रोल करता न येणे ही सणकीपणाची सुरुवात असते. अशावेळी जेव्हा आपल्या ऊर्मीवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा विघातक किंवा धोकादायक कृत्ये घडतात. गुन्ह्यांची सुरुवात ही अशा वेळी होत असते. ही लक्षणे ज्या रोगात दिसतात त्याला इंग्रजीत इम्पल्स कंट्रोल डिसॉर्डर म्हणतात. (Crime Diary)

गुन्हेगारीचे पाच टप्पे : एखाद्या गोष्टीचा मोह झाला, तर त्मोहाला बळी पडून गुन्हेगारी कृत्ये घडतात. मोहाला वेळीच आवर घालणे हे गुन्हेगारांना जमत नाही. मोहाला बळी पडण्याची ऊर्मी जेव्हा निर्माण होते, तेव्हागुन्हा घडण्याची शक्यता ही मोठी होत जाते. मानसिक विकाराचे लक्षणच ना ते. अशावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि विचारदेखील भरकटतात. यातून पाच टप्पे तयार होऊन गुन्हे घडण्याचे चक्र पूर्ण होते. पहिला टप्पा, ऊर्मी निर्माण होते. मग, दुसर्‍या टप्प्यावर ताण तयार होतो. तिसर्‍या टप्प्यावर अशी कृती करावीशी वाटते की, ज्यातून आनंद मिळेल. चौथ्या टप्प्यात, समाधान पावून मन शांत होते आणि पाचव्या टप्प्यात आपण केलेल्या कृत्याबद्दल हळूहळू अपराधीपणा वाटू लागतो किंवा काहीच वाटत नाही. गुन्हेगारांची मानसिकता या अशा पाच टप्प्यांच्या चक्रात अडकलेली असते.

मंत्र चळेपणा : मेंदूच्या पुढच्या भागात स्ट्रायटम नावाचा भाग असतो. हा एक नसांच्या पेशीचा पुंजका असतो. या ठिकाणी ऊर्मी किंवा सुरसुरी याची निर्मिती होते. यासाठी ग्लुटामेट आणि डोपामीन ही मेंदूतली रसायनं मदत करत असतात. एकच कृती वारंवार करत राहणं, ज्याला मंत्र चळेपणा किंवा ओ. सी. डी. असे इंग्रजीत म्हणतात. हा रोग देखील याच स्ट्रायटमचा सहभाग झाल्याने घडत असतो. या रोगात वारंवार हात धुणे, कुलूप लावले असले तरी वारंवार तपासणे इ. लक्षणे असतात. इंपल्स कंट्रोल डिसॉर्डर किंवा आयसीडी आणि ओसीडी या दोन्ही रोगांची ऊर्मीच्या बाबतीतली लक्षणं समान असतात. (Crime Diary)

ऊर्मी किंवा सुरसुरी यांच्यावर कब्जा मिळवता न येणे हे लक्षण अनेक स्वभाविकारांमध्ये आढळते. अगदी आपल्या परिचयाचे उदाहरण म्हणजे दारू पिल्यानंतर आपल्या ऊर्मीला आपण बेताल सोडून देतो. म्हणूनच अनेक वेळा दारूच्या नशेतदेखील गुन्हे घडलेले आहेत. गुन्हेगारांचे हे मनोविश्व मनोविकारग्रस्त असणे स्वाभाविक असते. गुन्हेगारांची ही मनोविकृती समजून घेणे फार महत्त्वाचे असते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news