Shiv Sena Crisis : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुनावणी लांबणीवर | पुढारी

Shiv Sena Crisis : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Shiv Sena Crisis : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणी आता १ मार्चला होण्याची शक्यता आहे. यापुर्वी २ फेब्रुवारी ही संभाव्य तारीख सर्वोच्च न्यायलयाच्या वेळापत्रकात देण्यात आली होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता १ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली आहे.

यापूर्वी शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव या प्रकरणावर १५ डिसेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ही सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता होती. मात्र त्यापुर्वीच आता १ मार्च ही नवी तारीख समोर आली आहे.

Back to top button