Dhule News : लोकसभा निवडणुकांसाठी विधानसभास्तरीय मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण  | पुढारी

Dhule News : लोकसभा निवडणुकांसाठी विधानसभास्तरीय मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण 

धुळे- पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनरचे प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी नितिन गावंडे, मनपा उपायुक्त संगिता नांदुरकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, संदीप पाटील, सुरेखा चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसिलदार आशा गांगुर्डे, नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी दिपक वाघ, उप जिल्हा पुरवठा अधिकारी मुकेश कांबळे,नायब तहसिलदार प्रविण बागुल यांच्यासह जिल्ह्यातील विधानसभास्तरीय मास्टर ट्रेनर उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने निवडणूकीच्या अधिसूचना, निवडणूक संदर्भातील मार्गदर्शक सूचना, कायदे व नियमांची माहिती, आदर्श आचार संहिताबाबत नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या टिमचे प्रशिक्षण, नियम, सूचना याबाबतची माहिती सर्व नोडल अधिकाऱ्यानी यावेळी उपस्थित मास्टर ट्रेनरला देण्यात आली.

आज आयोजित करण्यात आलेल्या प्रथम सत्रात आदर्श आचारसंहिता बाबत निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, खर्च व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी दिपक वाघ, माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती व पेड न्यूज विषयी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा निवडणुक व्यवस्थापन विषयी उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान साहित्य, मतदान केंन्द्राची तयारी बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, निवडणूक यादीबाबत उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्रात मतदार शिक्षण, निवडणूक सहभाग, स्विप बाबत मनपा उपायुक्त संगिता नांदुरकर, माहिती तंत्रज्ञानाबाबत जिल्हा सूचना अधिकारी महेश खडसे, ईव्हीएम, व्हीव्हीपीटी बाबत नायब तहसिलदार प्रविण बागुल, पोस्टल बॅलेट बाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, मतमोजणी व निकाल जाहिर करणे बाबत उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन मास्टर ट्रेनर दिनेश सैदाणे यांनी तर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अव्वल कारवून अमित सांगळे, ऑपरेटर हर्षल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

Back to top button