Pune Crime news : हॉटेलवर चालू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन्…

Pune Crime news : हॉटेलवर चालू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन्…
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पैशाचे आमिष दाखवून तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे. लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून 6 तरुणींची सुटका केली. याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रज्योत हिरीण्णा हेगडे (वय 27, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश श्याम शेट्टी (वय 29, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलमध्ये 6 तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा मॅनेजरांना अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, सागर केकाण, इम्रान नदाफ, इरफान पठाण यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news