नाशिक जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंडळ होणार स्थापन | पुढारी

नाशिक जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंडळ होणार स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूकविषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक जिल्हा निवडणूक कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरतासंदर्भात जनजागृती, प्रचार आणि प्रसार व्हावा. प्रत्येक महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षर मंडळाची स्थापना करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने पुढील कामकाजाचे स्वरूप निश्चित करून रूपरेषा ठरविण्यात आली.

बैठकीस तहसीलदार मंजुषा घाडगे, नायब तहसीलदार राजेश अहिरे, प्रज्ञा कुलकर्णी तसेच वर्शिप अर्थ फाउंडेशनचे सीईओ तेजस गुजराथी, महाराष्ट्र समन्वयक अल्ताफ पिरजादे, स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील, एनएसएसचे नाशिक जिल्हा समन्वयक रवींद्र अहिरे, यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक राजेंद्र वाघ, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक अविनाश शिरसाठ उपस्थित होते. जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.

हेही वाचा :

Back to top button