

पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अख्खं जगाचं लक्ष या दोन देशांकडे लागून राहिले आहे. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. युक्रेनच्य़ा लोकांप्रती तिने सहानुभूती दाखवलीय. प्रियांका चोप्राने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय-युक्रेनमध्ये आता जी स्थिती आहे, ती खूप भयानक आहे.
भोळे आणि निर्दोष लोक भीतीच्या छायेखाली आहेत. ते भविष्याची अनिश्चितता वर्तवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे समजणं कठीण आहे की, आज या मॉडर्न जगात इतकी भयानक आणी भीतीदायक स्थिती कशी उद्भवू शकते? या वॉर झोनमध्ये जे भोळे लोक राहत आहेत, ते तुमच्या आणि माझ्यासारखे आहेत.
युक्रेनच्या लोकांची पुढे कशी मदत करावी, याची सर्व माहिती माझ्या बायो लिंकमध्ये आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, युक्रेनचे लोक किती चिंतेत आणि भीतीखाली आहेत. प्रियांकाच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स खूप साऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. युक्रेनच्य़ा लोकांसाठी प्रार्थना करत आहेत.
प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा एक फोटो तिची आई मधू चोप्रा यांनी आपल्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केला होता. मधू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की- "एक सुंदर प्रवास". या फोटोवर प्रियांकाच्या सासऱ्याने केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पॉल केविन जॉनस हे प्रियांकाचे सासरे आहेत. त्यांनी आपल्या सूनेच्या आईला खूपच अनोख्या पद्धतीने अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी मधू चंद्राला शुभेच्छा देताना लिहिले की, काश आमच्या नशिबात सुद्धा प्रियांकाच्या वडिलांना भेटण्याचा योग असता. पण आज तुम्ही दोघी आमच्या आयुष्याचा एक भाग आहात. याबाबत आम्ही स्वतःला नशीबवान समजतो.